Tuesday 15 September 2020

अब्राहम लिंकनचे डॉक्टरांस पत्र(योगेश परदेशी) ©

🔰अब्राहम लिंकनचे डॉक्टरांस पत्र ..!

(विनंती आणि सलाम)

🖋️योगेश परदेशी


प्रिय डॉक्टर,

सगळेच विषाणू बिनविषारी नसतात,

नसतात सगळेच विघटनशील,

हे शिकेलच मानवजात कधी ना कधी,

मात्र त्यांना हेदेखील शिकवा,

की प्रत्येक बदमाश विषाणूगणिक ..

असतो एखादा रक्षक अँटिडोटही..!


घाणेरडे जिवाणू असतात जगात,

तसेच असतात स्वच्छ सॅनिटायझरही,

असतात टपलेले किटाणू तशीच जपणारी,

रोगप्रतिकारक शक्तीही..!

मला माहित आहे सगळयाच गोष्टी  लवकर नाही शिकवता येत,

तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,

स्वच्छता राखून कामवलेले आरोग्य हे

गोळ्या खाऊन  जगवलेल्या शरीरापेक्षा मौल्यवान असते..!


सुट्टी कशी स्वीकारावी हे त्यांना शिकवा,

त्यांना शिकवा क्वारंटाईनचा काळ संयमानं घ्यायला..!

तुमच्यात शक्ती असेल तर त्यांना 

सर्दी, खोकल्यापासून दूर राहायला शिकवा.!

शिकवा त्यांना आपला हात साबणाने धुवायला..!

रोगांना भीत जाऊ नका म्हणावं

त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं..!

जमेल तसं दाखवीत चला त्यांना 

आपलं लसीकरणाचं वैभव,

मात्र त्याचबरोबर मिळू द्या त्यांच्या मनाला निवांतपणा,

कुटुंबाचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला !


दवाखान्यात त्यांना हा धडा मिळू द्या,

लपवून ठेवलेल्या रोगापेक्षा,

सरळ चाचणी करून घेणे अधिक श्रेयस्कर आहे..!


अशा परिस्थितीत आपले डॉक्टर, आपले सरकार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यांनी ,

बेहत्तर आहे सर्वांनी त्यांना 'भक्त' ठरवलं तरी..!

त्यांना सांगा त्यांनी पोलिसांशी भलाईनं वागावं..!

आणि फिरणाऱ्यांना अद्दल घडवावी..!


आमच्या जनतेला हे पटवता आलं तर पहा, 

इकडे तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील न होण्याची, ताकद त्यांनी कमवायला हवी.

पुढे हेही सांगा त्यांना,

ऐकावं जनाचं, अगदी सर्वांचं,

पण जाणून घ्यावं सत्य, WHO च्या संकेतस्थळावरून..!


जमलं तर त्यांच्या मनावर बिंबवा ,

आनंदी राहावं त्यांनी उरातलं दुःख दाबून,

आणि म्हणावं त्यांना मास्क लावायची लाज वाटू देऊ नका!


त्यांना शिकवा साठेबाजांना तुच्छ मानायला,

अन् साठेबाजीपासून सावध राहायला!

त्यांना हे पुरेपूर समजावा की गरजेच्या 

वस्तू भरपूर मिळतील बाजारात पैशांच्या मोबदल्यात, पण म्हणून, गर्दी करू नये त्यांनी दुकानाबाहेर किंवा मंडीमध्ये..!


रिकामटेकड्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला..!

आणि ठसवा त्यांच्या मनावर..!

हे समोर जे संकट दिसतंय त्यासाठी घरात पाय रोवून लढत राहा..!


आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय,

लोखंडाचं कणखर पोलद होत नसतं.!

त्यांच्या अंगी बाणवा,

21 दिवस घरात राहण्याचं धैर्य ,

अन् धरला पाहिजे धीर त्यांनी

जर थांबवायचं असेल हे युद्ध..!

आणखीही एक सांगत राहा त्यांना 

आपला दृढ विश्वास पाहिजे स्वतःवर !

तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर...!

माफ करा डॉक्टर मी फार बोलतो आहे,खूप काही मागतो आहे..!

पण पहा जमेल तेवढं आवश्य कराचं!

आमचे लोकं, 

भलतीच भाबडी आहेत हो ती..!


(संकल्पना : ©️योगेश परदेशी)

#corona #doctors #who #Healthministry 

#behealthy #quarantine #lockdown

#marathidoctors